महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज,; वाचा राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य 2024 (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 12:11 AM IST

मेष (ARIES) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्यानं आपण खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभ सुद्धा होईल. मित्र आणि सगे सोयरे ह्यांच्या भेटीनं घरातील वातावरण आनंदी होईल. उत्तम कपडे आणि भोजन प्राप्ती होईल. मित्राकडून भेटवस्तू मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. आज सावध राहावं लागेल. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही आणि कुटुंबीय ह्यांच्याशी मतभेद झाल्यानं आपण दुःखी व्हाल. आपण सुरू केलेले काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्यानं मन निराश होईल. अविचाराने घेतलेल्या निर्णयाने गैरसमज निर्माण होतील.

मिथुन (GEMINI) :आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळं हर्षोल्हास वाढेल. पत्नी आणि संततीकडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्यानं आनंद मिळेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क (CANCER): आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात आहे. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीनं लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आईची तब्बेत उत्तम राहील. धन-संपत्ती, मान-सन्मानाची प्राप्ती होईल. घराच्या सजावटीत फेरबदल कराल. दिवसभराच्या कामामुळं थकवा जाणवेल. प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

सिंह (LEO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात आहे. आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेलं काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. व्यवसायात अडचणी येतील आणि वरिष्ठ नाराज झाल्यानं तुम्हाला दुःख होण्याची शक्यता आहे. प्रकृती साधारण राहील.

कन्या (VIRGO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात आहे. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणं हितावह राहील. आज आपला आवेश आणि राग वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. स्नेही आणि कुटुंबीयांशी वाद झाल्यानं आपण दुःखी व्हाल. शक्यतो प्रवास टाळा. हितशत्रूपासून सावध राहा.

तूळ (LIBRA) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. आज आपलं मन मित्रांसह खाणं-पिणं, फिरावयास जाणं तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने आणि वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान-सन्मान संभवतात.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. स्त्रीयांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. धनलाभ होईल. अपूर्ण कामे तडीस जातील.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्यानं निराशा येण्याची शक्यता आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती आस्था राहील. संतती विषयक चिंता राहिल्यानं मन बेचैन होईल. शक्यतो आज प्रवास टाळावा.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावं लागेल. घरातील क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान-प्रतिष्ठेची हानी होईल. पुरेशी विश्रांती न मिळाल्यानं आरोग्य बिघडेल. उत्साह आणि स्फूर्ती राहणार नाही. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. स्नेहीजन घरी आल्यानं आनंद वाटेल. प्रवासाची शक्यता आहे.

मीन (PISCES): आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज खर्च, संताप आणि जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार आणि पैश्यांच्या देवाण-घेवाणीत सावध राहावं. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवीमुळं आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

12 राशींसाठी कसा राहील नोव्हेंबर शेवटचा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details