हैदराबाद Sarvapitri Amavasya 2024 : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास 'पितृपक्ष' (Pitru Paksha 2024)या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात, पितरांच्या मृत्यूतिथी नुसार श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसली, तर 'सर्वपित्री अमावस्याला' सर्व (Amavasya 2024) पितरांचं श्राद्ध कर्म होऊ शकतं, असं हिंदू धर्मात सांगितलं.
सर्व पित्री अमावस्याला करा श्राद्ध :पितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात. ज्यात कुत्रा, गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या आत्म्याची तृप्ती होऊन त्यांना शांती मिळते असा समज आहे. पितरांच्या मृत्यूतिथी नुसार श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसली, तर 'सर्वपित्री अमावस्याला' सर्व पितरांचं श्राद्ध कर्म करू शकता. मृत्यूनंतर जर पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म झाले नाही, तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही, असा समज आहे.
अमावस्या तिथी : यंदा सर्वपित्री अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 38 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजून 22 मिनिटांनी समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्यानं मान्यतेनुसार, 02 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केलं जाईल. पंचांगानुसार पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी कुतुप, रौहीन इत्यादी शुभ मुहूर्त मानले जातात. श्राद्ध संबंधित विधी दुपारच्या शेवटी करावेत. श्राद्धाच्या शेवटी तर्पण केलं जातं.