महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

Uddhav Thackeray : रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; भाजपावर हल्लाबोल करत म्हणाले, "त्यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी..."

Ratnagiri Uddhav Thackeray Sabha : उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुहागरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसंच 'भाजपाचं हिंदुत्व गोमूत्रधारी' असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

Uddhav Thackeray Ratnagiri Guhagar Speech slams Narendra Modi over various issues
उद्धव ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 8:59 PM IST

रत्नागिरी Ratnagiri Uddhav Thackeray Sabha :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज (14 मार्च) कोकणच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांची गुहागरमध्ये जाहिर सभा पार पडली. या सभेत बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? : यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपाचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे. यांच्या तोंडात शिव्या, आमच्या तोंडात ओव्या आहेत. भाजपाची भोकं पडलेली हे लोक आम्हाला शिव्या देतात. पण ते जसा उल्लेख करतात, तसा एकही शिवसैनिक करणार नाही." तसंच मागील निवडणुकीत विनायक राऊतांना कोकणातील जनतेनं निवडून दिलं नसतं तर कोकणात गुंडगिरी वाढली असती”, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

पुढं ते म्हणाले की, "देशात हुकूमशाही आणण्याचा यांचा डाव आहे. काश्मीरची निवडणूक होत नाही, मुंबईची निवडणूक होत नाही. हे पुतीन सारखं करणार असून आपली लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी बसले तर काय शिल्लक राहील? सर्वोच्च न्यायालयानं वेळीच औषध द्यावं."

शिंदे गटावरही साधला निशाणा : “जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा मी मुख्यमंत्री झालो. तेव्हा मी महाराष्ट्रासाठी काम करत होतो. पण या भाडोत्री जनता पक्षानं आपले सरकार गद्दारी करून पाडायला सांगितलं. पण जे गद्दार गेले, त्यांच्या पोराबाळांना मी विचारतो, तुम्हाला आम्ही काय कमी दिलं? मंत्रीपदं दिली, आमदारकी, खासदारकी दिली”, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपावर हल्लाबोल केला.

भास्कर जाधवांविषयी काय म्हणाले? : दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत भाष्य केलं. ते म्हणाले की, "भास्कर जाधव लक्षात घ्या तुम्ही एकटे नाहीत, शिवसेना तुमच्या पाठिशी आहे", असं म्हणत त्यांनी भास्कर जाधवांना धीर दिला. तसंच पुढं ते म्हणाले की, "भास्कर जाधवांच्या शाखेसमोर जे घडलं, ते अत्यंत चुकीचं होतं. ही कोणती संस्कृती आहे?", असा सवालही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackrey News : "भाजपानं निवडणुकीसाठी उमेदवार..", आघाडीत येण्याची ऑफर दिल्यानं गडकरींचा उद्धव ठाकरेंना टोला
  2. Uddhav Thackeray : अबकी बार 'चंद्रहार'! पळपुटे, नामर्द पळून जातायत आणि मर्द पक्षात येतायत; उद्धव ठाकरेंची गर्जना
  3. 'एक खडा तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होत नाही', रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details