गडचिरोली: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. एक निकाल भाजपाच्या बाजूनं लागला आहे तर राज्यातील मतदार राजानं कुणाच्या पदरात मतांचं दान टाकलं? हे आज स्पष्ट होणार आहे आणि राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती सोपवणार? याचा फैसला आज होणार आहे. राज्यात गडचिरोली जिल्हा सर्वाधिक मतदान झालेल्या जिल्ह्यामध्ये अग्रेसर होता. त्यामुळे या ठिकाणी काय निकाल लागतो याची उत्सुकता आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाली होणार हे पाहाणं उत्सुकतेचं आहे.
तिन्ही विधानसभा क्षेत्रात चुरशीची लढत : गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात चुरशीची लढत दिसून आली असून जिल्ह्यात एकूण 29 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी डॉ. मिलिंद नरोटे, मनोहर पोरेटी, कृष्णा गजबे, रामदास मसराम, धर्मरावबाबा आत्राम, अम्ब्रीशराव आत्राम, भाग्यश्री आत्राम या उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला होणार आहे.
कोण आघाडी आहे?: पहिल्या फेरीनंतर २२०० मतांनी आघाडीवर असलेले धर्मराव बाबा आत्राम यांनी पाचव्या फेरीअखेर २९९३ मतांची आघाडी कायम ठेवली आहे. १०२१७ मतांनी अंब्रीशराव आत्राम दुसऱ्या क्रमांकावर येतात तर धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या वडिलांच्या विरोधात टिकू शकल्या नाहीत असं चित्र त्यांना मिळालेल्या ६८९० मतांनी स्पष्ट होतं. तर दहाव्या फेरीनंतर काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना १७०० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.
मतदारसंघाचा इतिहास : गडचिरोली हे एक अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा असलेले मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी आदिवासी मतदारांचा मोठा प्रभाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्या मुख्यतः आदिवासी समाजाची असून, येथील समस्यांचे निराकरण आणि विकास हे मुख्य मुद्दे निवडणुकीत असतात.
हेही वाचा -
- मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीच्या कलानुसार महायुती 200 हून अधिक जागांवर आघाडीवर
- राज्यातील 50 मतदारसंघात फाईट; कोणाची कॉलर होणार टाईट? अवघ्या काही वेळातच निकाल होणार स्पष्ट
- हा जनतेचा कौल नाही, भाजपानं यंत्रणा हातात घेतली - संजय राऊत