महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

चिकनप्रेमींनो सावधान! चिकनचे हे 5 भाग चुकूनही खाऊ नका; अन्यथा पडेल महागात - NEVER EAT THESE 5 PARTS OF CHICKEN

वैद्यकीय तज्ञांचं म्हणणे आहे की चिकन खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु, त्याचे काही भाग खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

NEVER EAT THESE 5 PARTS OF CHICKEN  WHICH PARTS OF CHICKEN NOT BE EATEN  WHICH PART OF CHICKEN IS HEALTHY  BENEFITS OF CHICKEN
चिकनचे हे पार्ट खाणं आहे हानिकार (Freepik)

By ETV Bharat Health Team

Published : Feb 27, 2025, 11:48 AM IST

Never Eat These 5 Parts Of Chicken: चिकनचा नुसता उल्लेख केला तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. बहुतेक लोकांना चिकन खायला आणि ते वेगवेगळ्या प्रकारे बनवायला आवडते. मांसाहारी लोकांनमध्ये चिकनला अन्यन स्थान आहे. नातेवाईकांच्या मेजवानीत चिकनचे खवय्ये चिकनची भाजी करतात. चिकनपासून आपण विविध प्रकारच्या डिशेस बनवू शकतो. चिकन फ्राय, चिकन मसाला, चिकन बिर्याणी, चिकन करी ह्या सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या डिश आहेत. चिकन चवीसाठीच नाही तर शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. परंतु, चिकन खाताना खबरदारी घेणे गरजेचं आहे. कारण चिकनचे काही भाग खाल्ल्यास आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. चला तर पाहूया चिकनचे कोणते चार भाग चुकूनही खावू नयेत.

  • चिकनची स्किन चुकूनही खावू नये

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत चिकन मोठ्या आवडीने खाल्ली जाते. परंतु, चिकनची स्किन खाणं टाळलं पाहिजे. हे शरीरासाठी हानिकारक असते. स्किन खाल्ल्यानं आरोग्यावर दुष्परिणाम होवू शकतात. तज्ञांच्या मते, स्किन खाणं अत्यंत धोकादायक ठरू शकते. कारण चिकनच्या त्वचेमध्ये अतिशय हानिकारक चरबी असते. तसंच ते शरीराला कोणतेही पोषण देत नाही. चिकनच्या शरीरातील इतर भागापेक्षा पूर्णपणे निरुपयोगी असेल तर ती त्यांची त्वचा आहे. (अहवाल)

  • चिकन नेक:अनेकांना चिकन नेक खायला आवडते. परंतु या भागात कोंबडीचीलसिका प्रणालीअसते. लसीका प्रणाली कोंबडीच्या शरीरातील कचरा आणि बॅक्टेरिया काढून टाकते. यासोबतच, कोंबडीच्या शरीरातील लसीका प्रणाली द्रवपदार्थ, लिपिड्स काढून टाकते आणि संसर्ग नियंत्रित करण्यास मदत करते. ते द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यात आणि आतड्यांमधून चरबी शोषण्यात देखील भूमिका बजावते. अशा परिस्थितीत, कोंबडीचा हा भाग खाल्ल्याने विषारी पदार्थ शरीरात जाण्याचा धोका असतो. जर हा भाग खाल्ला तर त्यातील हानिकारक घटक आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात. म्हणून तुम्ही चिकन नेक खाऊ नये.
  • चिकन विंग्स:काही लोकांना चिकन विंग्स खायला खूप आवडते. मात्र, या भागात अनेक हानिकारक जंतू आणि बॅक्टेरिया असतात. हे जंतू खाल्ल्यानंतर लगेच शरीरावर विपरीत परिणाम होवू शकत नाही. परंतु कालांतराने ते आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात. म्हणून, कोंबडीच्या विंग्सचा भाग फेकून देणे आणि तो खाणे टाळणे चांगले.
  • चिकन हेड अँड गिल्स:चिकन नेक आणि टेलसह चिकन गिल्स किंवा हेड खाणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. कोंबडीच्या गिल्समध्ये अन्न पचवण्याचे भाग असतात. हे भाग जंतू आणि हानिकारक जीवाणूंनी भरलेले असतात. या जंतूंमध्ये आपल्या शरीराला हानी पोहोचवण्याची क्षमता असते. म्हणून, चिकन गिल्स किंवा डोके पूर्णपणे खाणे टाळा.
  • चिकनची फुफ्फुसे(काळज): चिकनची फुफ्फुसे हा आणखी एक भाग आहे जो खाऊ नये. या भागात जंतू आणि विषाणू मोठ्या प्रमाणात असतात. हे खाल्ल्याने शरीरात गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणून, हा भाग खाणे टाळावे. सर्वसाधारणपणे चिकन हे एक उत्कृष्ट अन्न आहे जे शरीराला पोषक तत्वे प्रदान करू शकते. पण आरोग्य राखण्यासाठी कोणते भाग खावेत आणि कोणते खाऊ नयेत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
  • चिकन खाण्याचे फायदे

पोषणतज्ञ डॉ. सुचरिता सेनगुप्ता यांच्या मते , चिकनमध्ये लीन प्रोटीन असते. हे कमी चरबीयुक्त प्रथिने आहे. चिकनमध्ये व्हिटॅमिन बी-6, सेलेनियम आणि नियासिन सारख्या पोषक तत्वांचाही समावेश असतो. मर्यादित प्रमाणात चिकन खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. विशेषतः हिवाळ्यात थंडी कमी करण्यासाठी चिकन उपयुक्त आहे. चिकन सूप खाल्ल्याने किंवा पिल्याने खोकला, सर्दी आणि विषाणूजन्य ताप यापासून आराम मिळतो.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details