महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

चेहऱ्यावर आईस क्यूबने मसाज करणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या जानकारांचं मत

चमकणाऱ्या चेहऱ्यासाठी आईस क्यूब मसाज करणे फायदेशीर आहे काय? मसाज दिवसातून किती वेळा करावा याबद्दल तज्ञांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

Ice On Face
चेहऱ्यावर आईस क्यूबने मसाज (Getty Images)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Nov 11, 2024, 7:15 PM IST

Ice On Face : प्रत्येकाला सुंदर आणि तेजस्वी चेहरा हवा असतो. त्यासाठी बाजारात उपलब्ध अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा आपण वापर करतो. कुणी घरीच नैसर्गिक फेस पॅक तयार करतात तर कुणी पार्लरमध्ये जावून फेशियल करण्यास प्राधान्य देतात. तसंच काहीजण चमकदार त्वचेसाठी घरगुती टिप्स फॉलो करतात. अशीच एक ब्युटी टीप आहे, आईस क्यूबची मसाज. परंतु आईस क्यूबनं चेहऱ्यावर मसाज करताना अनेक संभ्रम आपल्यामध्ये असतात. चला जाणू घेऊया तज्ञांचे म्हणणे काय आहे.

  • चायनीज ब्युटी टीप:मेकअप करण्यापूर्वी दररोज चेहऱ्यावर बर्फानं मसाज करणे किंवा चोळणे फायदेशीर आहे. परंतु चेहऱ्यावर बर्फ चोळणे चांगलं आहे काय? हे सिद्ध होणारा एकही वैज्ञानिक पुरावा नाही, असं म्हणतात चेहऱ्यावर बर्फाच्या क्यूबनं मसाज करणे ही चायनीज ब्युटी टीप आहे. हळूहळू ही टिप आपल्यापर्यंत पोहोचली. अनेक लोक ही पद्धत बऱ्याच काळापासून पाळत आले आहेत. यामुळे फायदा होतो असं म्हटलं जाते. यामुळे चेहऱ्यावरील सुज नाहीसी होते. शिवाय चेहऱ्यावरील डागही नाहीसे होतात असं सौंदर्य तज्ञांच म्हणणे आहे.

"आईस क्यूबने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे छिद्रे उघडतात आणि त्वचा घट्ट होते. तसंच त्वचेला थोडी चमक येते. मेक-अप केल्यानंतरही ते चेहऱ्याला चांगले चिकटून राहते."

-डॉ. शैलजा सूरपणेंनी, सौंदर्यतज्ज्ञ

  • थेट लागू नका: काही लोक बर्फाच्या क्यूबने थेट चेहरा चोळतात. मात्र, असं केल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकते असं सौंदर्यतज्ज्ञ शैलजा सूरपणेंनी यांचं मत आहे. बर्फाचा क्यूब थेट चेहऱ्यावर लावण्याऐवजी स्वच्छ कपड्यात गुंडाळून गोलाकार, हलक्या हातानं चेहऱ्याची मसाज करण्याची शिफारस केली जाते. तसंच आइस क्यूब लावल्यानंतर चेहऱ्याला कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे मसाज केल्यानंतर मॉइश्चरायझर लावावे.
  • या लोकांनी आईस क्यूबने मसाज करू नये:काही लोकांच्या गालावर गुलाबी रेषा असतात. यामुळे ही ब्युटी टीप अशा लोकांसाठी योग्य नाही. तसंच काही लोकांना आईस क्यूबनं मसाज केल्यानंतर त्वचेवर पुरळ आणि लालसरपणा जाणवतो. अशा लोकांना आणि संवेदनशील त्वचा असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच ज्यांनी केमिकल पील आणि लेझर ट्रिटमेंट केली आहे. अशा लोकांनी काही वर्ष यापासून दूर राहावं. ही टीप कायमस्वरूपी नाही. म्हणून निरोगी त्वचेसाठी चांगला आहार आणि झोपेला प्राधान्य दिलं पाहिजे. आईस क्यूबने दिवसातून एकापेक्षा जास्त वेळ मसाज करू नये, असं मत डॉ. शैलजा सूरपणीं यांनी व्यक्त केलं आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ फायदेशीर
  2. तणाव एक, आजार अनेक; असे जगा ताणमुक्त जीवन
  3. तुम्हाला माहिती आहेत काय, केळी खाण्याचे अद्भुत फायदे?

ABOUT THE AUTHOR

...view details