मुंबई : व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित झालेला विकी कौशल स्टारर 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 31 कोटींची कमाई केली. 'छावा'नं तीन दिवसांत रुपेरी पडद्यावर 100 कोटींचा टप्पा ओलांडला. यानंतर 'छावा'नं एका आठवड्यात 200 कोटींचा टप्पा पार केला. तसेच 'छावा'नं 10व्या दिवशी 300 कोटींची कमाई केली. महाशिवरात्रीला या चित्रपटानं जगभरात 500 कोटींचा आकडा ओलांडला आहे. हा चित्रपट देशांतर्गत कलेक्शनमध्ये 400 कोटींच्या कलेक्शनकडे वाटचाल करत आहे. आता 'छावा'ची 13व्या दिवशीची कमाई जाणून घेऊया.
'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शनचा 13वा दिवस : 'छावा'नं रिलीजच्या 13व्या दिवशी सुमारे 23 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली, यासह चित्रपटाचं एकूण कलेक्शन 386. 25 कोटींवर पोहोचलं आहे. हा चित्रपट लवकरच देशांतर्गत 400 कोटींचा टप्पा ओलांडेल. 13 व्या दिवशी 'छावा'चा एकूण हिंदी वापर 34.43% होता.
'छावा'चं कलेक्शन
31 कोटी ओपनिंग कलेक्शन
तिसऱ्या दिवशी 100 कोटींचा टप्पा ओलांडला
पहिल्या आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडला
दहाव्या दिवशी : 300 कोटींचा टप्पा ओलांडला
386.25 कोटी (अंदाजे) दिवस 13 (एकूण कलेक्शन)
जगभरात 509.75 कोटी कमाई
'छावा'नं या चित्रपटांना टाकलं मागे : अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकर यांचा 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपट सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर विशेष कामगिरी करू शकला नाही. बहुतेक प्रेक्षक 'छावा' पाहण्यासाठी येत आहेत. तसेच, व्हॅलेंटाईन आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'सनम तेरी कसम'चे पुनर्प्रदर्शन देखील थिएटरमध्ये सुरू आहे. या चित्रपटानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
'छावा'नं जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडला : सॅकनिल्कच्या मते, विकी कौशल स्टारर चित्रपटानं जगभरात चांगली कामगिरी केली आहे. जगभरात 509.75 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा आकडा 12 दिवसांचा आहे. तसेच 13व्या दिवसाच्या जगभरातील कमाईचे आकडे अजून येणे बाकी आहेत. तसेच 'छावा'नं 'बाहुबली 2'ला देखील हिंदी कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. विकी कौशलचा हा चित्रपट हिंदी पट्ट्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. फक्त अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' यापेक्षा पुढे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे आणि याची निर्मिती मॅडॉक फिल्म्सनं केली आहे.
हेही वाचा :
- विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत 'छावा'चं बॉक्स ऑफिसवर राज्य, जाणून घ्या कमाई...
- विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केला धमाका, जाणून घ्या 10व्या दिवसाची कमाई...
- बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं वादळ, विकी कौशल स्टारर चित्रपट गाठेल 400 कोटींचा टप्पा...