मुंबई Vettainyan Movie New Song :अभिनेता रजनीकांतच्या 'वेट्टयान'मधील पहिलं गाणं 'मनासिलायो' रिलीज केल्यानंतर काही दिवसांनी, निर्मात्यांनी पुन्हा एकदा चित्रपटातील एक गाणं रिलीज करून चाहत्यांना भेट दिली आहे. या गाण्याचे बोल 'हंटर वंतार' असे आहेत. 'वेट्टयान'मधील 'हंटर वंतार' गाणं खूप धमाकेदार असून आता अनेकांना पसंत पडत आहे. 'हंटर वंतार' हे गाणं सिद्धार्थ बसरूरनं गायलं आहे. या गाण्याला संगीतबद्ध अनिरुद्ध रविचंदरनं केलंय. यापूर्वी रिलीज झालेलं 'मनासिलायो' गाणं देखील चाहत्यांना खूप आवडलं होतं. 'वेट्टयान'च्या निर्मात्यांनी 20 सप्टेंबर म्हणजे आजच जवाहरलाल इनडोअर स्टेडियम, चेन्नई येथे एक भव्य ऑडिओ लॉन्च कार्यक्रम आयोजित केला आहे.
'वेट्टयान' चित्रपटामधील रजनीकांतची भूमिका : मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत, अमिताभ बच्चन, राणा दग्गुबाती, फहद फासिल, मंजू वॉरियर, अनिरुद्ध रविचंदर आणि टीजे ज्ञानवेल यांच्यासह चित्रपटातील काही कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अलीकडेच, निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रजनीकांत त्यांच्या चित्रपटातील संवाद बोलताना दिसत होता. या व्हिडिओच्या शेवटी तो म्हणतो, "दिग्दर्शक सर, सुपर सर." व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी यावर लिहिलं होतं, 'सुपरस्टार रजनीकांत डबिंग सत्रात.' 'वेट्टयान' चित्रपटामध्ये रजनीकांत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.