मुंबई -Oscars 2024 Nominees List: 96 व्या वार्षिक अकादमी पुरस्कार 10 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील ओव्हेशन हॉलीवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा बायोपिक 'ओपेनहाइमर' एकूण 13 नामांकनांसह आघाडीवर आहेत. तसेच 'पुअर थिंग्ज' 11 नामांकन आणि मार्टिन स्कॉर्सेसचा 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून'ला 10 नामांकन मिळाले आहेत. नामांकित कलाकारांमध्ये जॉडी फॉस्टर, एम्मा स्टोन, रायन गोसलिंग, रॉबर्ट डी नीरो, ब्रॅडली कूपर आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिमी किमेल करणार आहे. जिमी किमेलनं याआधी तिन वेळा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होत. 'ऑस्कर 2024' सोहळा थेट एबीसी (ABC) चॅनेलवर प्रसारित होणार आहे. भारतात डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय 'ऑस्कर 2024' 11 मार्च रोजी आयसीटी ( IST)वर पहाटे 4 वाजता प्रदर्शित होईल. आता नामांकनाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ती आपण पाहूया.
खाली नामांकनाची यादी पाहा:
1. बेस्ट पिक्चर
- अमेरिकन फिक्शन
- एनाटॉमी ऑफ ए फॉल
- बार्बी
- होल्डओव्हर
- किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
- मेस्ट्रो
- ओपेनहाइमर
- पास्ट लाइव्स
- पुअर थिंग्स
- द जोन ऑफ इंटरेस्ट
2. सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता
- ब्रॅडली कूपर
- कोलमैन डोमिंगो
- पॉल जियामाटी
- सिलीयन मर्फी
- जेफ्री राइट
3. सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्री
- एनेट बेनिंग
- लिली ग्लॅडस्टोन
- सैंड्रा हुलर
- केरी मुलिगन
- एमा स्टोन
4. सहाय्यक भूमिकेतील अभिनेता
- स्टर्लिंग के. ब्राउन
- रॉबर्ट डी निरो
- रॉबर्ट डाउनी ज्युनिअर
- रायन गोसलिंग
- मार्क रफलो
5. सहाय्यक भूमिकेतील अभिनेत्री
- एमिली ब्लंट
- डेनिएल ब्रुक्स
- अमेरीका फरेरा
- जोडी फॉस्टर
- डावाइन जॉय रैंडोल्फ
6. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
- जस्टीन ट्रीट
- मार्टिन स्कॉर्सेसी
- क्रिस्टोफर नोलन
- योर्गोस लॅन्थिमोस
- जोनाथन ग्लेझर
7. लेखन आणि स्क्रीनप्ले
- अमेरिकन फिक्शन
- बार्बी
- 'ओपेनहाइमर'
- पुअर थिंग्स
- द जोन ऑफ इंटररेस्ट
8. लेखन आणि पटकथा
- एनाटॉमी ऑफ ए फॉल
- होल्डओव्हर
- मेस्ट्रो
- मे डिसेंबर
- पास्ट लाइव्स
9. आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म
- आईओ कैपिटानो
- परफेक्ट डेज
- सोसायटी ऑफ द स्नो
- द टीचर्स लाउंज
- द जोन ऑफ इंटरेस्ट
10. ॲनिमेटेड फीचर फिल्म
- द बॉय अॅन्ड द हेरॉन
- एलिमेंटल
- निमोना
- रोबोट ड्रीम्स
- स्पाइडर-मैन: स्पाइडर-वर्स के पार