मुंबई : प्रेक्षक साऊथ सुपरस्टार धनुष, नागार्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'कुबेर' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी 'कुबेर'ची पहिली झलक समोर आली होती. आता 'कुबेर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. याबरोबर एक धमाकेदार पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. रश्मिका मंदान्नानं तिच्या ट्विटर अकाउंटवर 'कुबेर' चित्रपटाचे एक जबरदस्त पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये धनुष आणि नागार्जुन एकमेकांसमोर असल्याचे दिसत आहेत.
'कुबेर' कधी होईल रिलीज? : रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये धनुष आणि नागार्जुन हे गंभीर लूकममध्ये असल्याचे दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टरवर लिहिलं गेलं आहे, '20 जून 2025 रोजी चित्रपटगृहात, महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.' कुबेरचा फर्स्ट लूक गणेश चतुर्थीला प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटा फर्स्ट लूक हा एका टीझरसारखाच होता, यामध्ये धनुष आणि नागार्जुन वेगळ्या अवतारात दिसले होते. दुसरीकडे रश्मिका देखील फर्स्ट लूक झलकमध्ये धमाकेदार दिसली होती. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये धनुष पूर्ण दाढी आणि वाढलेल्या केसांसह एका नवीन अवतारामध्ये दिसत आहे. आता त्याच्या विचित्र लूकमुळे सर्वांनाच हा चित्रपट कशाबद्दल असेल असा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे, नागार्जुन अक्किनेनीच्या व्यक्तिरेखेतही काहीतरी नवीन दिसत आहे. आता चित्रपटात काय घडणार आहे हे पाहणे रंजक ठरेल.