मुंबई :सोशल मीडियावर धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल दोघांबद्दलही बरीच चर्चा होत आहे. 2024च्या अखेरीस, जेव्हा धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाहीत, यानंतर हे स्पष्ट झालं की, दोघांमध्ये काही ठीक नाही. हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. यानंतर 2025च्या सुरुवातीला दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. तसेच 20 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घटस्फोटाच्या बातमी समोर आली. वर्षाच्या सुरुवातीपासूनच दोघेही चर्चेचा विषय बनले. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी त्याच्या नात्याबद्दल काहीही सोशल मीडियावर विधान केलं नाही.
युजवेंद्र चहलनं शेअर केली पोस्ट : सध्या दोघेही एकमेकांवर सोशल मीडिया पोस्टद्वारे टीका करत असतात. आता युजवेंद्र चहलनं पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो खूप दुःखी असल्याचा दिसत आहे. त्यानं शेअर केलेल्या फोटोवरून चाहते अंदाज लावत आहे की, तो सध्या ठिक नसेल. अनेकजण त्याच्या पोस्टवर आता प्रतिक्रिया देत आहेत. युजवेंद्र चहलनं बुधवारी संध्याकाळी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तो हातात फुले धरून आहे, तसेच तो दुसऱ्या फोटोत तो कोणाला तरी फुल देत आहे. या पोस्टमध्ये त्यानं कॅप्शनमध्ये 'मुंतझीर' लिहिलं आहे. हा एक अरबी शब्द आहे.