मुंबई -16 जानेवारी रोजी सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर घरात गाडी होती, मात्र ड्रायव्हर नसल्यानं त्याला रुग्णालयात ऑटोनं नेण्यात आलं होतं. अलीकडेच सैफ अली खान ऑटो ड्रायव्हर भजन सिंग राणाला भेटला. आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये सैफ हा ऑटो ड्रायव्हर भजन सिंग राणाबरोबर असल्याचा दिसत आहे. एका रिपोर्टनुसार आपत्कालीन परिस्थितीत ऑटो चालक भजनसिंग राणा यांनी सैफकडून पैसे देखील घेतले नव्हते. आता सैफ अली खान त्याच्यावर खूश आहे. या ऑटो चालकाला बक्षीस मोठी रक्कम दिली जाणार आहे. 21 जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळण्यापूर्वी सैफनं लीलावती रुग्णालयात भजन सिंगची भेट घेतली होती.
सैफनं घेतली ऑटो चालकाची भेट : सैफ आणि ऑटो चालकचा फोटो समोर आल्यानंतर अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. याशिवाय काहीजण सैफचं देखील कौतुक करत आहेत. दरम्यान लीलावती रुग्णालयात सैफ भजनसिंग राणाला पाच मिनिटांसाठी भेटला होता. भेटल्यानंतर सैफनं त्याला मिठी मारली. याशिवाय त्यानं यावेळी ऑटो चालकाला असं वचन दिलं की, त्याला कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर तो त्याची मदत करेल. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर सैफचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच ऑटो चालकबरोबर व्हायरल झालेल्या फोटोत सैफ हा पांढऱ्या शर्टसह आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये असल्याचा दिसत आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्याच्या हाताला पट्टी बांधून असल्याची देखील दिसली होती.
आरोपीनं 6 वेळा हल्ला केला होता :सैफ अली खानवरील हल्ल्याची बातमी ऐकून चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. ही बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. मुंबईतील पॉश वांद्रे परिसरात एका व्यक्तीनं त्याच्या घरात घुसून त्याच्यावर सहा वेळा हल्ला केल्याची ही घटना खूप थरारक होती. सध्या याप्रकरणी आरोपी आता पोलीस कोठडीत आहे. याशिवाय या घटनेबद्दल पोलीस आणखी तपास करत आहेत. आता सैफची प्रकृती ठिक आहे. दरम्यान ऑटो चालकाला त्याच्या प्रामाणिकपणासाठी आधीच 11 हजार रुपयांचा चेक मिळाला आहे. जर सैफ अली खानला योग्य वेळी रुग्णालयात नेले नसते तर काहीही घडू शकले असते. रुग्णालयात पोहोचल्यानंतर, ऑटो चालकानं भाड्याची काळजी न करता त्यांना जाऊ दिलं. ऑटोचालक म्हणाला होता की," एखाद्याच्या जीवापेक्षा पैसा काही महत्त्वाचा नसतो."
सैफला भेटल्यानंतर ऑटो चालकाने काय म्हटले? : सैफ अली खानला भेटल्यानंतर ऑटो ड्रायव्हर भजन सिंग म्हटलं, "सैफ अली खानच्या पीआर टीमनं मला फोन केला, सर्वांनी माझे कौतुक केले, मी चांगले काम केल्याचं सांगितलं, करिना जीने माझे आभार मानले आणि सैफच्या आईने मला आशीर्वाद दिला. सर्वांना खूप आनंद झाला की, मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तो लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचावा म्हणून मी ऑटो वेगानं चालवत होतो, पण सैफनं हळू गाडी चालवायला सांगितलं, त्याला धडधडत होते, तो वेदनेनं ओरडत होता, पण आम्ही सर्वजण वेळेवर पोहोचलो त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मलाही आनंद आहे की तो आता बरा आहे."
हेही वाचा :
- सैफ अली खान हल्ला प्रकरण; डावकी नदीत पोहून घुसला भारतात, शरीफुल इस्लामचा कसा झाला 'विजय' ?, जाणून घ्या आरोपीची मोडस ऑपरेंडी
- सहा तास शस्त्रक्रिया होऊनही अभिनेता सैफ अली फिट कसा? संजय निरुपम यांचा सवाल
- सैफ अली खानला अभिनेताच देणार सुरक्षा सेवा, गुन्हे रिक्रिएशनमध्ये पोलिसांना काय आढळलं?