हैदराबाद National Safety Day 2024 : सुरक्षितपणे काम करण्यासाठी जागरुकता आणि वचनबद्धता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 4 मार्च रोजी भारतात 'राष्ट्रीय सुरक्षा दिवस' साजरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं पर्यावरण, कामाच्या ठिकाणी सुरक्षा, रहदारी सुरक्षा आणि मानवी आरोग्य सुरक्षेसह सर्व सुरक्षा नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी या दिवशी सुट्टी जाहीर केलीय.
काय आहे इतिहास? :भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (NSC) 4 मार्च 1966 रोजी स्थापना झाल्यापासून व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याविषयी सार्वजनिक जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जाचो. NSC ची स्थापना झाल्यानंतर एका दशकानंतर हा कार्यक्रम सुरू झाला. कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रचार करणे, अपघात टाळणे आणि सुरक्षित तसंच निरोगी कामाचं वातावरण निर्माण करणे ही NSC ची मुख्य उद्दिष्टे आहेत. कामाची ठिकाणे सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवण्यात कामगार आणि सरकार काय भूमिका बजावतात यावर भर देण्याची संधी राष्ट्रीय सुरक्षा दिवस देते.
काय आहे महत्त्व ? : राष्ट्रीय सुरक्षा दिनाचं अनेक कारणांमुळं खूप महत्त्व आहे. उद्योग, कामाची ठिकाणे, घरं आणि सार्वजनिक जागांसह विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षिततेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. हा दिन विविध मोहिमा, प्रात्यक्षिकं आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे सुरक्षिततेच्या जोखमींबद्दल जागरूकता वाढवतो. तसेच प्रतिबंधात्मक कृतींना प्रोत्साहन देतो. 'राष्ट्रीय सुरक्षा दिवस'निमित्त, लोकांना त्यांच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये सुरक्षितता प्रक्रियांचं पालन करण्यास आणि सुरक्षित वर्तन स्वीकारण्यास प्रोत्साहित केलं जातं. हे सुरक्षिततेच्या संस्कृतीलादेखील प्रोत्साहन देते. यामध्ये व्यक्ती त्यांच्या सुरक्षिततेसाठी तसंच इतरांच्या सुरक्षेसाठी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारतात. त्यामुळं अपघात आणि जखमी होण्याचं प्रमाण कमी होते. सुरक्षिततेचं महत्त्व आणि अपघातांचे परिणाम अधोरेखित करुन हा दिवस धोरण बदल आणि सुरक्षा मानके वाढवणाऱ्या नियमांसाठी प्रोत्साहन म्हणून काम करतो. राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षिततेच्या प्रचारात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित केलं जातं.
हेही वाचा :
- कशी असेल सर्व राशींच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशीभविष्य
- किशोर मानसिक आरोग्य दिन : किशोरावस्थेतील मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करणे महत्वाचे