पटना (बिहार) :Bihar Political Crisis : बिहारमध्ये एनडीएच्या पाठिंब्याने नितीश कुमार पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याची दाट शक्यता आहे. थोड्याच वेळात नितीश कुमार राजीनामा देणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडल्यानंतर नितीश कुमार राजभवनाकडे राजीना देण्यासाठी दाखल झाले आहेत. दुसरीकडे लालू प्रसाद काही मोठा डाव टाकतील का? अशीही जोरदार चर्चा सुरू आहे.
अमित शाह यांचा तेलंगणा दौरा रद्द : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाच्या बैठकीला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तेलंगणा दौऱ्यावर येणार होते. परंतु, त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी शनिवारी सांगितलं. बिहारमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असताना भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मांझी यांचं समर्थनपत्र : जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना रविवार रात्री उशिरा आपला पाठिंबा आहे असं समर्थन पत्र दिल आहे. काही दिवसांपtर्वी मांझी यांनी आजचं खेळ होईल असा आशयाचं ट्वीट केलं होत. तसंच, कुणी कुणाचं कायमचं शत्रू नाही, असही मांझी म्हणाले होते. परंतु, नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत बोलताना मांझी यांच्यावर जोरदार टीका केली होती.
आजच शपथ घेऊ शकतात : आज जेडीयू विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर लगेचच एनडीए विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर जेडीयू आणि भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटतील. तेथे महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार सकाळी 10:30 नंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. तसंच, एनडीएचा पाठिंबा असल्याचा पाठिंबा असल्याचं पत्र देऊन पुन्हा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी स्थिती आहे.