महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पहिल्याच यादीत भाजपाचा हिरमोड; भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार - Lok Sabha Elections

Pawan Singh Refusal Contest Lok Sabha Elections : भाजपानं शनिवारी सायंकाळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले 195 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये भोजपुरी गायक पवन सिंहचंही नाव होतं. मात्र, नाव जाहीर होऊन 24 तास होत नाहीत, तोपर्यंतच पवन सिंहनं निवडणूक लढण्यास नकार दिलाय.

भोजपुरी अभिनेता पवन सिंह
भोजपुरी अभिनेता पवन सिंह

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 4:46 PM IST

नवी दिल्ली Pawan Singh Refusal Contest Lok Sabha Elections : गायक पवन सिंहनं लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानलेत. मात्र, निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिलाय. परंतु, अद्यापपर्यंत पवन सिंहनं निवडणूक लढण्यास का नकार दिला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसंच, निवडणूक लढण्यास तो इच्छूक होता की नाही याबाबतही कोणतीच माहिती याअगोदरही समोर आलेली नव्हती. त्यामुळं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

चार अभिनेत्यांना उमेदवारी : अभिनेते आणि टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात भाजपानं पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. पवन सिंहचा खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे. मात्र, पवन सिंह यांनी आसनसोलमधून निवडणूक लढवण्यास नकार देऊन सर्वांनाच चकित केलंय. भाजपानं लोकसभेसाठी जी पहिली यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये 4 भोजपुरी अभिनेत्यांना उमेदवारी देण्यात आलीय. यामध्ये आसनसोलमधून पवन सिंह, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, यूपीच्या गोरखपूरमधून रवी किशन, आझमगडमधून दिनेश लाल यांच्या नावाचा समावेश आहे.

पवन सिंह यांची 'एक्स' पोस्ट : मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवून मला आसनसोलसाठी लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केलं. परंतु, काही कारणास्तव मी आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नाही.

अरणमधून तिकीट मिळू शकतं अशी चर्चा होती : भाजपानं पहिली यादी जाहीर केली त्यावेळी पवन सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले होते. पक्षाने विश्वास ठेवला असेल तर पूर्ण प्रामाणिकपणे आसनसोलच्या जनतेची सेवा करण्याचा उल्लेखही त्यांनी केला होता. पवन सिंह बिहारमधील अरण येथील रहिवासी आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष पवन सिंह यांनाच अरणमधून तिकीट देऊ शकतो अशी चर्चा होती. मात्र, पक्षाने त्यांना आसनसोलमधून उमेदवारी दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details