Youth Arrested In Mumbai : अवैधरित्या जिवंत काडतूस बाळगल्याने तरुणाला अटक - Youth Arrested carrying firearms
मुंबई - मुंबई कुरार पोलीसांना (दि. ११ फेब्रुवारी)रोजी ओमसाई सिध्दी वेलफेअर सोसायटी, आप्पापाडा, मालाड पुर्व मुंबई भागाग एका इसमाच्या राहत्या घरात दोन गावटी कट्टे व जिवंत काढतूस असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी गुन्हे विभागाने त्याठिकाणी जाऊन चिराग उर्फ पप्पू जाधव याला ताब्यात घेतले. (Youth Arrested In Mumbai) त्यावेळी त्याने अशा काही गोष्टी नाहीत असे सांगितले. मात्र, तेथे पडताळणी केली असता दोन गावटी कट्टे व दोन जिवंत काडतूस मिळाले. पप्पू कैलास जाधव, (वय-20 वर्षे) याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST