MP Imtiaz Jalil Warned : तुम्ही किराणा दुकानात वाईन ठेवा, आम्ही ती दुकान फोडू - खासदार इम्तियाज जलील - Imtiaz Jalil's role on wine sales
औरंगाबाद: तुम्ही किराणा दुकानात वाईन ठेवा , आम्ही दुकान फोडून टाकू असा इशारा खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil Warned ) यांनी दिला आहे. राज्य सरकारने वाईन विक्री बाबत कोणाच्या हरकती आहेत का? याबाबत जाहिरात दिली आहे, त्यावर खासदार जलील यांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली आहे. राज्याला वेगळी संस्कृती - किराणा दुकानात वाईन विक्री बाबत सरकारने नागरिकांच्या हरकती जाणून घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यावर आपण आपलं मत सांगितलं आहे. दुकानात दारू दिसली की, ते दुकान आम्ही फोडणार, अशी भूमिका एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील ( MIM leader MP Imtiaz Jalil ) यांनी स्पष्ट केली. काही नेत्यांनी इतर देशाचे दाखले देत त्याठिकाणी पाण्याऐवजी वाईन पिली जाते अस सांगितलं. मात्र महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संस्कृती दिली आहे. राज्यातील महिलांनी आपल्या हरकती तीव्र भाषेत नोंदवल्या पाहिजेत, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST