Silver Oak Attack : कालचा हल्ला पवार कुटुंबियांना इजा पोहचविण्याचा हेतूने : नीलम गोऱ्हे - शरद पवार घर सिल्व्हर ओक हल्ला
पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध काल ( ST Workers Agitation Azad Maidan ) तुटला. सरकारने आणि न्यायालयाने एसटीचे विलीनीकरण शक्य ( ST Merger With Government ) नाही, हे सांगितल्यानंतर आपल्या मागणीवर ठाम असलेल्या आणि संयम सुटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जोरदार धडक ( Sharad Pawar Home Silver Oak Attack ) दिली. 'शरद पवार मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद' अशा घोषणा देत या आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला आहे. यावर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे ( Nilam Gorhe On Silver Oak Attack ) यांनी आपली प्रतिक्रिया देत हल्लेखोरांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. तसेच काल हल्लेखोरांचा प्रयत्न बघितला तर पवार कुटुंबियांना ईजा देण्याचा होता. तसेच न्यायदेवतेचा निकाल यांना मान्य नाही असं काहीसं एसटी कर्मचाऱ्यांच प्रयत्न होता असं देखील यावेळी गोऱ्हे म्हणाले. मुंबईप्रमाणे पुण्यातही सार्वजनिक ठिकाणी निर्भया पथक नेमण्यात यावे असंही त्या म्हणाल्या. बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना झाली होती त्यावर त्या बोलत होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST