महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : सावित्रीच्या लेकींच्या हाती सावित्री पथकाची जवाबदारी - womens day 2022

By

Published : Mar 8, 2022, 5:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

नागपूर - नागपूर परिवहन विभागाकडून महराष्ट्रात पहिल्यांदाच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावित्री पथकाने उपक्रमाला सुरवात केली आहे. या महिला अधिकाऱ्यांच्या पथकाकडून परिवहन विभागाच्या कायद्याचे नियमांचे शिक्षण आणि नियम तोडणाऱ्यांना शिक्षा असा दुहेरीकार्यक्रम हाती घेतला आहे. या पथकाच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांना वाहतूक नियमाबद्दल साक्षर केले जाईल. महाराष्ट्रात राज्य सरकाराच्या सर्वच विभागात महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. नुकत्याच झालेल्या परिवहन विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये तीनशे महिला अधिकारी मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत झाल्या आहे. याच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सावित्री पथकाची संकल्पना नागपूर शहरात प्रादेशिक परिवहन विभागाकडून राबवली जात आहे. या माध्यमातून महिलांना जनजागृती करण्यात येईल.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details