woman committed Suicide : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, माहेरच्या लोकांनी केले घातपाताचे आरोप - आमगाव तालुक्यातील ठाणा
गोंदिया - जिल्हातील आमगाव तालुक्यातील ठाणा येथील दिपा धर्मेंद्र मेहर ( वय 30 ) या विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी म्हणजेच सासरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली ( woman committed Suicide ) आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दिपाचे चार महिन्यांपूर्वी प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांच्याशी लग्न झाले होते. प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांच्या पूर्व पत्नी अंकिताचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या मागे एक मुलगी आणि एक मुलगा आहे. ऑक्टोबरमध्ये धर्मेंद्र यांनी दिपाशी दुसरे लग्न केले. लग्नाच्या दुसऱ्या महिन्यापासून दिपाचा सासरी मंडळी हुंड्यासाठी छळ करत होते, असा आरोप दिपाच्या भाऊ व बहिणीने केले आहे. यामुळे ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोपही दिपाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. याबाबत अधिक तपास आमगाव पोलीस करीत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST