Gudi Padwa 2022 : डोंबिवलीत धुमधडाक्यात नववर्षाचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत - Dombivli Gudi padwa
ठाणे - कोरोना महामारीनंतर अखेर दोन वर्षांनंतर गुढीपाडवा मोठ्या उत्साह राज्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातही ठिकाणी शोभायात्रा दोन वर्षाने निघाल्याने रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे डोंबिवली आणि कल्याण शहरातील विविध सामाजिक संघटनासह राजकीय मंडळी नुतन वर्षांच्या स्वागत यात्रेत सहभागी ( Gudi padva celebrated in Dombivali ) झाले. सकाळपासूनच डोंबिवली, कल्याण, ठाणे शहरात दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात नववर्षाचे स्वागत केले. डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रा वक्रतुंड ढोल पथकाकडून सलामी वादन सुरू झाले. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दोन वर्षांनंतर डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंद आणि उत्साहाची लाट आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST