Russia Ukraine Crisis : आम्ही स्वतःला जमिनीखाली ठेवलंय, लवकरात लवकर आम्हाला बाहेर काढा.. ठाण्यातील विद्यार्थिनीची मागणी
ठाणे : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे ( Russia Ukraine Crisis ) युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी दहशतीखाली आले ( Indian students under terror ) आहेत. अडकून पडल्याने त्यांचे कुटुंबीय देखील भारत सरकारकडे मागणी करत आहेत. ते लवकरात लवकर घरी यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.आता अशाच प्रकारे ठाण्यातील एका विद्यार्थिनीने आपले मनोगत रेकॉर्ड करून नातेवाईकांना पाठवले आहे. हे विद्यार्थी ज्या ठिकाणी रहातात तेथे घराबाहेर सतत सुरु असलेल्या बॉम्बस्फोटमुळे भारतीय विद्यार्थ्यांनी स्वतःला अंडरग्राउंड करुन घेतलं ( Indian Students Underground In Ukraine ) आहे. यासाठी युक्रेनच्या भारतीय दूतावासाने ( Indian Embassy Ukraine ) सूचना केल्या आहेत. आता हे सर्व विद्यार्थी भारताकडे मदतीची मागणी करत आहेत. भारतीय दूतावास संपर्कात आहे. मात्र बचावासाठी दिलेल्या नंबरची अपडेट आणि माहिती मिळत नसल्याचे भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले. युक्रेनमध्ये अडकलेले हजारो विद्यार्थी व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर टाकत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST