Kandivali Bus Fire : कांदिवलीत व्होल्वो बसला लागली अचानक आग; कोणतीही जीवितहानी नाही - व्होल्वो बसला लागली आग
मुंबई - कांदिवली पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रो मार्गाखालील लक्झरी व्होल्वो बसला अचानक आग लागली. ही आग शार्टसर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. दरम्यान आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. शिवाय आग विझवण्याचे काम युद्धपातळी सुरु आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बस मालाडहून बोरिवलीच्या दिशेन जात असताना ही घटना घडली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST