VIRAL VIDEO : येवती येथे विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओला चोप - जळगाव पोलीसस्टेशन
जळगाव - बोदवड तालुक्यातील येवती येथील विद्यार्थींनी या जामठी येथे दोन किलोमीटर पायी चालत शाळेत जातात. यात तालुक्यातील बेटावद खुर्द येथील मुलगा बापू दुमाले हा दररोज मुलींना त्रास देत होता. या संदर्भात विद्यार्थींनींनी शाळेच्या शिक्षकांकडे तक्रार केली होती. हा मुलगा शाळेतील नसल्यामुळे शिक्षकासह विद्यार्थीनींनी हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानुसार पालकांनी संताप व्यक्त केला. मंगळवारी १५ मार्च रोजी ६.४५ वाजेच्या सुमार सर्व विद्यार्थींनी शाळेत नेहमीप्रमाणे जाताना पालकांच्या मदतीने मुलगा बापू दुमाले हा मुलींसमोर येताच त्याला पकडले. आणि त्याला शाळेत हजर करून विद्यार्थींनींनी चपलांनी चांगलाच चोप दिला. पालकांनी मुलाला आता बोदवड पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST