महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : शिवारांमध्ये बिबट्यांचा मुक्त वावर; तर ऊसतोड मजूर भीतीच्या छायेत - leopards in satara

By

Published : Mar 2, 2022, 6:00 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

कराड (सातारा) - कराड तालुक्यातील शेतशिवारांमध्ये बिबट्यांचा मुक्त वावर पाहायला मिळत आहे. यामुळे ऊसतोड मजूर भीतीच्या छायेत आहेत. ऊसतोड हंगामावर देखील परिणाम झाला आहे. बिबट्यांचे दर्शन होत असलेल्या परिसरातील ऊसतोड करण्यास मजूर नकार देत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात शिवारात ऊस पडून आहे. मजुराच्या मुलावर हल्ला करून बिबट्याने त्याला ठार केल्याच्या घटनेपासून कराड तालुक्यातील ऊसतोडीचा वेग कमी झाला आहे. शिवारांमध्ये रोज बिबट्यांचे दर्शन होत आहे. कराड तालुक्यातील येरवळे गावात शेतातील रस्त्यावर दोन बिबटे मुक्तपणे वावरताना पाहायला मिळाले. अचानक समोर बिबटे दिसल्याने शेतकर्‍याची पाचावर धारण बसली. तरीही धाडसाने शेतकर्‍याने आपल्या मोबाईलमध्ये बिबट्यांचे चित्रिकरण केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details