Goa Assembly Election Result 2022 : पणजीतला धक्कादायक निकाल, पाहा काय म्हणाले उत्पल पर्रीकर - गोवा विधानसभा 2022 निकाल
हैदराबाद - पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढतीकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना भाजपला टक्कर देण्यात अपयश आले आहे. पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला आहे. पणजीत भाजप समर्थक जल्लोष करत आहेत, तर उत्पल पर्रीकर यांच्या गोटात शांतता आहे. अपक्ष उमेदवार म्हणून ही एक चांगली लढत होती, मी लोकांचे आभार मानतो. लढतीबद्दल समाधानी आहे, परंतु निकाल थोडासा निराशाजनक आहे," दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST