World Sparrow Day 2022 : चिऊताई जगावी! आज जागतिक चिमणी दिन, पहा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम - जागतिक चिमणी दिवस
निफाड (नाशिक) - आज जागतिक चिमणी दिनानिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड येथील विद्यार्थ्यांनी 'चिमणी वाचवा-चिमणी जगवा या 'विशेष उपक्रमांतर्गत टाकाऊ पाण्याच्या बाटलीपासून आकर्षक असे 500 फिडर तयार केले. याद्वारे या शाळेतील विद्यार्थ्यांनी चिमण्यांच्या अन्न- पाण्याची सोय केली आहे. इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या वाया गेलेल्या बाटल्या, आईसक्रीमचे रिकामे डबे, खराब झालेल्या भरण्या, वाया गेलेली प्लास्टीकची झाकणे यांचा वापर करून चिमण्यांसाठी आकर्षक 500 फिडर तयार करून चिमण्यांच्या दाण्या-पाण्याची सोय केली आहे. हे फिडर परिसरातील झाडांवर, घरातील बाल्कनी, गच्चीवर ठेवण्यात आले. एकाच फिडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व पाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चिमण्यांच्या घटत्या संख्येचा विचार करता 'चिमणी वाचवा-चिमणी जगवा' हा अभिनव उपक्रम राबवला आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST