VIDEO : संभाजीराजे छत्रपतींचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे उपोषण योग्य - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड - डॉ. भागवत कराड येवला नाशिक
येवला (नाशिक) - खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत. ( MP Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation ) 70 ते 80 टक्के मराठा समाज गरीबच आहे आणि त्यांना शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण मिळाले पाहिजे, या मताचा मी आहे. ( Dr. Bhagwat Karad on Maratha Reservation ) या आरक्षणासाठी ते जे उपोषण करत आहेत त्यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होते. मात्र, या महाविकास आघाडीच्या सरकारने आरक्षण टिकवले नाही म्हणून संभाजीराजे जे करत आहेत ते योग्य आहे, असे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. ( Union Minister Dr. Bhagwat Karad on Sambhajiraje Chhatrapati ) तसेच महाविकास आघाडी सरकारने त्यांना मदत केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते येवला येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Union Minister Dr. Bhagwat Karad in Yeola )
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST
TAGGED:
डॉ. भागवत कराड येवला नाशिक