Bhagavat Karad On Sharad Pawar : 'शरद पवार काय बोलतात यापेक्षा युक्रेनहून विद्यार्थी परत आणणे जास्त महत्त्वाचे' - PM Narendra Modi On Maharashtra Tour
जालना - शरद पवार काय बोलतात यापेक्षा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना ( Ukraine stuck student ) भारतात परत आणणे जास्त महत्त्वाचे आहे. या शब्दात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर ( Bhagwat Karad On Sharad Pawar ) दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर ( PM Narendra Modi On Maharashtra Tour ) येणार असून त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, शरद पवारांनी मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर टीका केली होती. कराड हे एका कार्यक्रमानिमित्त जालन्यात आले होते यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना कराड पुढे म्हणाले की, मोदी यांनी युक्रेनच्या शेजारी असलेल्या चारही देशांमध्ये चार मंत्र्यांना पाठवले असून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी ते तिथे ठाण मांडून बसलेले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST