Ukrain Citizens in Goa on war : युक्रेन-रशिया वादात भारताने युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करावे - युक्रेनच्या नागरिकांची मागणी - यूक्रेन रशिया युद्ध
पणजी (गोवा) - युक्रेन आणि रशियामधील युद्धाचे पडसाद ( Russia Ukrain War Impact ) आत्ता जगभर पडत असून आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात आलेल्या युक्रेनच्या नागरिकांनी आज पणजीत चर्चसमोर रशियाविरोधात शांततेच्या मार्गाने निदर्शने केली. ( Ukrain People in Panji ) युद्ध हा कोणत्याही बाबीला पर्याय होऊ शकत नाही. युद्धामुळे आमच्या देशात असणाऱ्या आमच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि देशवासियांना अतोनात हाल सहन करावे लागत असल्याचे या नागरिकांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले. भारत हा जगात शक्तिशाली देश आहे. या देशाकडे जागतिक पातळीवर नेतृत्त्व करणारे नेते आहे. म्हणून भारताने यात हस्तक्षेप करून त्वरित रशियाशी बोलुन युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही या नागरिकांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST