School Van Accident VIDEO : भरधाव 21 मुलांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन झाडाला धडकली; चालकाचा मृत्यू, अनेक जखमी - School Van Accident
उज्जैन (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील देवास रस्त्यावरील चांदेसरा गावाजवळ मुलांना शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला ( Ujjain Horrific Road Accident ) आहे. भरधाव व्हॅनवरील नियत्रंण सुटल्याने व्हॅन झाडाला जाऊन आदळली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा 10 सेकंदाचा सीसीटीव्ही समोर आला आहे, ज्यावरून ही व्हॅन खूप वेगात होती असा अंदाज लावता येतो. गाणे ऐकत असताना चालक गाडी चालवत असल्याचा आरोप मुलांनी केला. अपघाताच्या वेळी स्कूल व्हॅनमध्ये 21 मुले होती, त्यापैकी 19 जखमी झाले. चार मुलांची प्रकृती चिंताजनक असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी गठित केलेले पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST