CCTV Video : अमरावतीत दोन गटात तुफान राडा; मारहाणीत दोन जण जखमी - अमरावती लाईव्ह अपडेट
अमरावती - शहरातील शेगाव नाका परिसरात डॉ. बनकर यांच्या रुग्णालयासमोर शुक्रवारी रात्री तरुणांच्या दोन गटात तुफान राडा ( two groups free stile fighting ) झाला. चाकू, तलवार आणि भाले घेऊन दोन्ही गटातील युवक एकमेकांवर तुटून पडले या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून ते तिघेही गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शेगाव परिसरातील रहिवासी आहेत. राडा घालणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती असून या घटनेमुळे शेगाव नाका परिसरात शनिवारी रात्री भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा संपूर्ण राडा डॉक्टर बनकर यांच्या रुग्णालयासमोर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोन गटातील परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी शेगाव आणि शेगाव नाका परिसरात गस्त वाढवली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST