Tribals Stage Protest : वनजमिनींच्या हक्कासाठी आदिवासींचा मंत्रालयावर मोर्चा - आदिवासींचा मंत्रालयावर मोर्चा
वनाधिकार कायद्यानुसार राज्यातील आदिवासींना ते कसत असलेल्या वर्षानुवर्षांच्या जमिनीवर हक्क मिळावा ( Tribals protest front of Maharashtra Mantralaya ) तसेच सातबारा आदिवासींचा नावे व्हावा, यासाठी लोकसंघर्ष मोर्चा संघटनेच्यावतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो आदिवासी महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत. वनाधिकार कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी. तसेच 2012 चा वनाधिकार कायदा कायम करण्यात यावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST