Congress Portest in Mumbai : मुंबईत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सौराष्ट्र एक्सप्रेस थांबवली; केंद्र सरकारविरोधात आंदोलन - Congress against ED
बोरीवली ( मुंबई ) - मुंबई युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सौराष्ट्र एक्सप्रेस ( Saurashtra Express ) थांबवून ईडी आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन ( Agitation against Central government)करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीने चौकशी केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. राज्यभर नव्हे तर देशभर ईडीच्या चौकशीचे पडसाद उमटत आहेत. अनेक काँग्रेस समर्थक रसत्यावर उतरले आहेत. 3 दिवसापूर्वी देखील सोनिया गांधी यांची 5 तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी देखील देशभरात काँग्रेस कार्यकर्ताकडून या चौकशीचा निषेध करण्यात आला. मुंबईतही काँग्रेसकडून ( Congress ) रस्त्यावर उतरत आक्रमकरित्या ईडी चौकशीचा विरोध करण्यात आला. ( Congress against ED ) आंदोलन करत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.