महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Clash of women: लोकल रेल्वेमध्ये महिलांमध्ये पुन्हा मारामाऱ्या.. एकमेकांना दिला चोप - Western Railway local

By

Published : Oct 12, 2022, 10:20 PM IST

मुंबई - मध्य रेल्वे मधील महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ मागील आठवड्यात व्हायरल झाला होता. त्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रवाशांमध्ये एकच चर्चा होती. मात्र, आज पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेच्या ( Clash of women in Western Railway local ) दादर ते विरार या लोकलमध्ये महिलांची हाणामारी ( Clash of women in local train ) झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या अफाट गर्दीमुळे लोकलच्या डब्यात चढताना एकमेकांना धक्का लागण एकमेकांच्या पायावर पाय पडणे ,बॅग लागणं कोपर ढोपर एकमेकांना लागणं . ही बाब नित्याची झालेली आहे. प्रत्येकाजवळ असलेली बॅग ही आता शरीराचा एक भाग असल्यासारखीच गोष्ट मान्य झाली आहे. मात्र गर्दीमध्ये या अशा छोट्या-मोठ्या गोष्टी वरून जागा माझी की तुझी यावरून भांडण होतं. याचे पर्यावसन हाणामारीत पाहायला मिळते. पश्चिम रेल्वे वरील दादर ते विरार या लोकल ट्रेनमध्ये आज काही वेळापूर्वी महिलांची हाणामारी पाहायला मिळाली हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details