महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Monsoon Latest Update : यंदा मान्सून एक आठवडा आधीच, काय आहेत कारणे? पहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट - डॉ अनुपम काश्यपी

By

Published : May 23, 2022, 7:13 PM IST

Updated : May 23, 2022, 7:26 PM IST

पुणे - भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा आणि वाढत्या तापमानाचा अनुभव येत आहे. अशातच भारताच्या हवामान विभागाने नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार ( monsoon arriving in Maharashtra week earlier ) आहे. कालच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. तर 27 मे रोजी तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा लवकरच मान्सून दाखल होण्याची कारणे काय याबाबत जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून... मध्यंतरी चक्रवर्ती वादळ, तसेच असनी चक्रीवादळ तसेच जे काही वादळी परिस्थिती निर्माण झाली होती. हे सगळे बंगालच्या उपसागरात तयार झाले आणि कोस्टल आंध्रप्रदेश येथे संपले. यामुळे मान्सून परिस्थितीती निर्माण झाली आणि त्यामुळेच यंदा मान्सून लवकर दाखल आहे. आणि त्यामुळेच नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाल्याचे जाहीर केल आहे. अशी माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ अनुपम काश्यपी ( Dr Anupam Kashyapi ) यांनी दिली आहे.
Last Updated : May 23, 2022, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details