Dussehra Melava 2022 : एसटी बससाठी दहा कोटी रोख कुठून दिले ? ईडी सीबीआयमार्फत चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी - busses booked by Shinde group in mumbai
मुंबई : एसटी बसेस साठी दहा कोटी रोख ( Ten crore cash for ST buses ) कुठून दिले. यंत्रणा आता शिंदे गटाची चौकशी करणार का ? काँग्रेसचा सवाल. दसरा मेळाव्यासाठी ( Dussehra Melava 2022 ) शिंदे गटाकडून एसटी महामंडळाच्या १८०० बसेस बुक करण्यात आल्या आहेत. या बससाठी मोजण्यात आलेली दहा कोटी रुपयांची रक्कम कोणी भरली. ही रोख रक्कम कुठून आली याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी होणार का ? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress spokesperson Atul Londhe ) यांनी केला आहे. यंत्रणा केवळ विरोधकांसाठीच आहेत का ? या सर्व व्यवहाराची चौकशी आता यंत्रणांनी करावी अन्यथा हे पुन्हा एकदा सिद्ध होईल की केंद्रीय यंत्रणा या केवळ विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी वापरल्या जात आहेत. भाजपमध्ये सहभागी व्हा आणि काहीही मस्ती करा असेच आता दिसून येत आहे. अन्यथा या सर्व व्यवहाराची आणि सीबीआय मार्फत चौकशी करून आपण हिम्मत दाखवावी असेही लोंढे यांनी म्हटले आहे.