Weather Forecast News: ऑरेंज अलर्टच्या दिवशीही मुंबईकर पावसाविना कोरडेच - Mumbai Forecast
मुंबई: मुंबईत (Weather Forecast News) गेल्या आठवड्यात शुक्रवारी रेड अलर्ट दिला होता. त्यावेळी मुंबईत (Mumbai Forecast) पाऊस पडला नव्हता. पावसाने ड्राय डे साजरा केला होता. आता पुन्हा एकदा मंगळवार पासून गुरुवार पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, मुंबईत सूर्य प्रकाश पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्टच्या दिवशीही मुंबईकरांना चिंब ओले होता आले नाही.