आपण कोण होतो हे आपण मागे वळून पाहिले पाहिजे - खोतकरांचा बंडखोरांना टोला - आपण कोण होतो हे आपण मागे वळून पाहिले पाहिजे
आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ज्या विश्वासाने शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली ही जबाबदारी आम्ही अत्यंत निष्ठापूर्वक पार पाडू अशा विश्वास माजी मंत्री शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Shiv Sena leader Arjun Khotkar) यांनी व्यक्त केला आहे. खोतकर यांनी यावेळी आपण मागे वळून पाहिले पाहिजे आपण होतो कोण.? आणि झालो कोण? हे स्वतःच्या मनाला निश्चित पणे प्रश्न पडला पाहिजे.मी तरी पुढे जात असताना सातत्याने मागे वळून पाहतो.आपण होती कोण आणि झालो कोण..असा टोला ही त्यांनी कुणाचे ही नाव न घेता बंडखोर आमदारांना लगावला.