आम्ही शिवसेनेतचं! पक्ष पुढे नेण्यासाठीच हा निर्णय; बंडखोर सामंत यांची प्रतिक्रिया - महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ
मुंबई - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ( After the revolt by Eknath Shinde ) शिवसेनेतील 38 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ ( Political Crisis in Maharastra ) झाली आहे. तसेच, शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिवसेना आक्रमक ( Shiv Sena aggressive ) झाली. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने निदर्शने केली. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्याच पार्श्वभूमीवर आज आपली भूमिका मांडण्यासाठी शिवसेनेचे बंडखोर मंत्री उदय सामंत यांनी गुवाहाटी येथून एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.