Nagin Dance : चक्क सापासोबत वरातींचा नागिन डान्स; पाहा व्हिडिओ - Nagin Dance With Live Snake
मयूरभंज (ओडिशा) - ओडिशामधील मयूरभंज जिल्ह्यातील करंजिया शहरात एका विवाहच्या वरातीत नाचण्यासाठी चक्क गारुड्याला बोलवण्यात आले होते. यावेळी त्यांनी रस्त्यावर एका विषारी सापासोबत नृत्य ( nagin dance in marriage procession ) केले. या सर्पमित्र पुंगीच्या तालावर नागाला संमोहित करून लग्नाच्या मिरवणुकीत वऱ्हाडाची करमणूक करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल ( mayurbhanj nagin dance video viral ) झाला आणि करंजिया वनविभागाला कळवण्यात आले. माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्पमित्रासह पाच जणांना ताब्यात घेतले. करंजियाचे डीएफओ श्रीकांत नाईक यांनी सांगितले की संपूर्ण राज्यात कोठेही सापाच्या खेळाला किंवा प्रदर्शनांना परवानगी नाही. "लग्नाच्या मिरवणुकीत वराती हे बेकायदेशीर कृत्ये करत होते, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल," असेही ते म्हणाले.