Cobra Video : कोब्राने गिळले दोन मैना पक्षी; अन् गुंतले तोंडात, पुढे झाले असे काही... पाहा व्हिडिओ
शिवमोग्गा (कर्नाटक) - शिवमोग्गा येथील मुद्दीनकोप्पा गावात एका घरट्यात कोब्राने ( cobra ) घुसून दोन मैना पक्षी गिळंकृत केले होते. यावेळी घरट्यातून बाहेर येण्यासाठी साप धडपडत असल्याचे कुटुंबीयांना दिसले आणि त्यांनी तात्काळ सर्पमित्र किरणला बोलावले. सर्पमित्र किरण यांनी घटनास्थळी येऊन सापाची घरट्यातून सुटका केली. त्यानंतर सापाने दोन पक्ष्यांना पोटातून बाहेर काढले. यानंतर सापाला सुखरूप पकडून जंगल परिसरात सोडण्यात आले.