महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Warkari expectation from PM Modi : वारकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'या' अपेक्षा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वारकरी यांना अपेक्षा

By

Published : Jun 14, 2022, 1:17 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर ( Warkari expectation from PM Modi ) येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वारकरी ( Warkari dehu ) भागवत पताका स्तंभाचे पूजनही ( PM Modi dehu visit ) होणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील लोकार्पणसोहळ्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा मंडपात वारकऱ्यांना संबोधित करणार आहे. मोठ्या संख्येने सभा मंडपात वारकरी हे दाखल झाले असून, अनेक वारकऱ्यांनी आजचा दिवस हा आमच्यासाठी दिवाळी सारखा असल्याचे सांगितले आहे. तर काही वारकऱ्यांनी पंतप्रधानांकडून या अपेक्षाही व्यक्त केल्या. काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, आज ते देहूत येणार आहे. यावेळी पंतप्रधानांना ऐकण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून इंद्रायणी नदी काठ संवर्धन, तसेच वारी बाबत अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details