Video : 'आ बैल मुझे मार'.. बाहुबलीच्या भल्लालदेवप्रमाणे तरुणाने वळूला डिवचले.. अन् झाले 'असे' काही - छत्तीसगढ़ न्यूज
Viral video of man and bull fight Jagdalpur: बाहुबली या सुपरहिट चित्रपटात भल्लालदेवने जंगली वळूशी दोन हात आजमावले होते. छत्तीसगडच्या जगदलपूरमध्येही असेच दृश्य पाहायला मिळाले. इकडे भल्लालदेवच्या स्टाईलमध्ये एक विक्षिप्त तरुण वळूशी झुंज देऊ लागला. वळूने त्या तरुणाला शिंगावर उचलून फेकूनही दिले. मात्र तरुणाने पुन्हा कॉलर उंचावून वळूच्या शिंगाला धरायला चालू केले. यावेळी वळूने तरुणाला हवेत जोरात फेकून दिले. त्यानंतर तो तरुण मार्गस्थ झाला. तरुण आणि वळूच्या भांडणाचा हा व्हिडिओ जगदलपूरच्या दंतेश्वरी मंदिर परिसराचा आहे. अनेकांनी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. (Jagdalpur Viral video)