Bhagirathi River: पुरस्थितीमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात! चक्क नदीवरून ट्रालीतून प्रवास;पाहा व्हिडिओ
उत्तरकाशी (उत्तराखंड) - सायुना गावातील पादचारी मार्ग खराब झाल्याने ग्रामस्थांना भागीरथी नदीच्या च्क्क धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. येथे ट्रॉलीवरून लोक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. ही ट्रॉली अतिशय जीर्ण झाली आहे. ( Bhagirathi River ) तसेच, त्याचे दोरही काही प्रमाणात कमकुवत झालेले आहेत. ते पाहून हे मोठ्या अपघाताला निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या सायुना येथील ग्रामस्थांची आजही रोप-ट्रॉलीच्या त्रासातून सुटका झालेली नाही. ट्रॉलींमुळे सातत्याने अपघात होत असून, यंत्रणा गाफील राहिली आहे. या गावासाठी ट्रॉलीच्या जागी शासन व प्रशासन कायमस्वरूपी तोडगा काढू शकले नाही. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या ओलांडण्यासाठी ग्रामस्थ जीव धोक्यात घालत आहेत.