Video : हत्ती चिडला, आला कारवर धावून, पाहा व्हिडिओ - हत्ती व्हायरल व्हिडिओ
मेट्टुपालयम - कोटागिरी रस्त्यावर वन्यप्राण्यांची सतत वर्दळ असते. गुरुवारी मध्यरात्री मेट्टुपलायम-कोटागिरी रस्त्यावर कुंचप्पन्नईजवळ जंगली हत्तीने रस्ता ओलांडला. त्याने अचानक समोरून येणाऱ्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कार चालकाने तात्काळ कार उलटवून सुरक्षित ठिकाणी उभी केली. या घटनेचा व्हिडिओ हा व्हायरल होत आहे.