Tekdi Ganesh Temple Video : संकष्टीनिमित्य टेकडी गणेश मंदिरात फळांची आकर्षक आरास - टेकडी गणेश मंदिर
नागपूर - गणेश टेकडी मंदिर (Video Story Ganesh Temple )हे नागपुरकरांचे आराध्य दैवत आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्य भाविक मोठ्या संख्येनं येथे दर्शनासाठी येतात. आज गणेश मंदिराच्या गर्भगृहात खास पद्धतीने फळांची आरास करत सजावट करण्यात आली. यामध्ये विशेषत: या ऋतूत मिळणाऱ्या आंबा, सफरचंद, डाळिंब, केळ, आणि अननस या फाळांचा उपयोग सजावटी करीता करण्यात आला. गणेश टेकडी मंदिरात करण्यात आलेली ही आकर्षक आरास डोळे दिपवणारी होती. संकष्टी चतुर्थीनिमित्य बाप्पांचे दर्शन घेण्यास भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.