VIRAL VIDEO : पन्हाळगडावर पुरुषांसह महिलाही ढोसतायत दारु; कारवाई होणार का ? - महिला मद्यपान पन्हाळगड कोल्हापूर
कोल्हापूर - गेल्या अनेक दिवसांपासून पन्हाळगडच्या संवर्धनासाठी अनेकजण आंदोलन मोर्चे काढत आहेत. प्रशासनाचे गडाकडे होत असलेल्या दुर्लक्षाची जाणीव करून देत आहेत. अशाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये काही पर्यटक पन्हाळगडावरील एका झुणका भाकरी केंद्रावर चक्क खुलेआम दारू ढोसताना दिसत आहेत. एखाद्या बिचवर पार्टी करावी अशाच पद्धतीने गडावरील या केंद्रावरून दारू आणि बियर पिताना हे सगळे दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये अनेक महिला सुद्धा दिसत आहेत. एक-दोन नव्हे तर अनेक दारूच्या आणि बियरच्या बाटल्या याठिकाणी टेबलवर दिसत आहेत.