Gyanwapi Masjid: ज्ञानवापी सर्वेक्षणाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल - Video of Gyanwapi Masjid
वाराणसी - ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणातील आयोगाच्या कारवाईचा व्हिडिओ लीक झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये वाजुखान्यात शिवलिंगासारखा दगड मिळाल्याचा दावा केल्यानंतर त्या ठिकाणचे चित्र दिसते. आतील तळघराचे चित्रही त्यात दिसते. ज्ञानवापीच्या पश्चिमेकडील भिंतीवरही खुणा दिसतात. आत एक विहीरही दिसते. अनेक हिंदू मंदिरांचे पुरावे भिंतीवर त्रिशूलाच्या खुणाही दिसतात. ज्ञानवापी संकुलामागील मंदिराच्या तुटलेल्या भागाचे अवशेषही त्यात दिसतात.