Video: अरुणावती नदीच्या पुलावर मधोमध अडकला शेतकरी - Arunavati river flood
वाशिम - जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे अरुणावती नदीने रौद्ररूप धारण केले आहे. मानोरा तालुक्यातील सेवादास नगर ते वरोली दरम्यान असलेल्या बंधाऱ्यावरून शेतकरी शेतात जात होता. यावेळी अचानक पाणी वाढल्याने वरोली येथील शेतकरी पुलाच्या मधोमध अडकून पडला आहे. दरम्यान याची माहिती गावकऱ्यांना मिळताच ग्रामस्थ पुलावर पोहचले. मात्र, साहित्य नसल्याने सकाळपासून जाग्यावरच अडकून आहे. दरम्यान प्रशासनाने वेळीच सुटका केली नाही आणि पाणी वाढल्यास वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान शेतकरी पुलावर अडकल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे.
Last Updated : Jul 22, 2021, 2:30 PM IST